परभाव टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये पुन्हा भिजण्याचे प्रयोग

परभाव टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये पुन्हा भिजण्याचे प्रयोग

सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. रविवारी संध्याकाळी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रचारसभा होती. पण ह्या प्रचारसभेदरम्यान अचानक वादळी पाऊस सुरु झाला. पण जयंत पाटील यांनी भर पावसातही आपले भाषण सुरूच ठेवले. त्यामुळे पराभवाच्या भीतीने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधीचा फायदा उठवत भिजण्याचा प्रयोग करण्यात आला असल्याची चर्चा पंढरपुरात रंगली आहे.

रविवारी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी जयंत पाटील आले होते. जयंत पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा सुरु झाली आणि थोड्याच वेळात ढगांच्या गडगडाटात, विजेच्या कडकडाटात वादळी पाऊसला सुरुवात झाली. अवकाळी पडलेला हा पाऊस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जयंत पाटलांना आयती संधी वाटली. कारण अशी पावसात भिजत सभा घेतल्याचा फायदा याआधीही त्यांच्या पक्षाला झाला आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री, टास्क फोर्सचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

लॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह

काशी विश्वेश्वराच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्यांना धमकीचे फोन

‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांची साताऱ्यात सभा सुरु असताना अवेळी पाऊस आला होता. पवारांनी त्या पावसात भिजत सभा घेतली आणि पक्षाला त्या सभेचा फायदा झाल्याची चर्चा सर्वत्र झाली. त्यामुळे पंढरपूरच्या पराभवापासून हा पाऊस आपल्याला तारेल असा विचार बहुदा जयंत पाटीलांनी केला असावा. भर पावसात त्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. आता पाटील यांच्या भिजण्याचा पक्षाला निवडणुकीत फायदा होतो का हे पाहावे लागेल.

एकीकडे महाराष्ट्र कोविडच्या विळख्यात अडकलेला असताना पंढरपुरात मात्र राजकीय रणकंदन सुरु आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समोरासमोर ठाकले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली असून राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून समाधान औताडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. आल्या दिवशी या मतदारसंघात प्रचारसभांचा रतीब लावला जात आहे.

Exit mobile version