लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर

अमेरिकेने निवेदन जारी करत लोकशाहीबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या शंका फेटाळल्या

लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर असून परदेशात जाऊन ते सातत्याने भारतातील लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र उभं करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रश्नांना आता खुद्द अमेरिकेनेच सणसणीत उत्तर दिले आहे.

अमेरिकेने निवेदन जारी करत लोकशाहीबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या शंका आणि प्रश्न फेटाळून लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत भारतात लोकशाही जीवंत असून जर कोणाला याबद्दल शंका वाटत असेल तर ते नवी दिल्ली येथे जाऊन स्वतः पाहू शकतात, असा टोला अमेरिकेने राहुल गांधी यांना लगावला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन याच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी व्हाईट हाऊसकडून सोमवार, ५ जून रोजी भारताबद्दल एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये भारतातील लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. व्हाईट हाऊसचे प्रमुख जॉन किर्बी यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात भारतात एक जीवंत लोकशाही पाहायला मिळत आहे. जर कोणाला याबद्दल शंका असेल तर ते नवी दिल्ली येथे जाऊन आपल्या डोळ्यांनी पाहू शकतात.’

हे ही वाचा:

धक्कादायक! पुतण्याने बॉलला हात लावला म्हणून काकाचे बोट कापले

अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्या चार जणांना अटक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!

किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले

राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी परदेशात मोदी सरकारवर टीका केली. त्यानंतर अमेरिकेकडून हे उत्तर राहुल गांधी यांना मिळाला आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना भारतीय लोकशाही दोन वेगवेगळ्या विचारधारांमध्ये विभागली गेली असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले की, भारतात दोन विचारधारांमध्ये संघर्ष सुरू आहे. एक ज्याचे आम्ही (काँग्रेस) प्रतिनिधीत्व करते तर दुसरी भाजप-आरएसएसची विचारधारा आहे. हे स्पष्ट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे एकीकडे महात्मा गांधी आहेत तर दुसरीकडे नथुराम गोडसे.

Exit mobile version