३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

भाजप आमदार अमित साटम यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री यांना पत्र लिहून मुंबईला पर्यावरण आपत्तीपासून वाचविण्यासाठी मेट्रोचा प्रश्न त्वरित सोडवून झाडांच्या कत्तली करण्याच्या परवानग्या देण्याच्या भ्रष्टाचारा विरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे.

अमित साटम यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून काढलेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांमध्ये सुमारे ३९ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिली असून त्यातील २१ हजार झाडे ही खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पाकरिता तोडण्याची परवानगी दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे शहरासाठी महत्त्वाचा असलेला मेट्रोचा प्रश्न मार्गी लागत असताना केवळ राजकीय इर्षेपोटी विरोध केला असल्याचे अमित साटम यांनी पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

…आणि महिला वनरक्षकाला वाघाने ओढत नेले जंगलात

मालिकेवर भारताचा शिक्का! हर्षल पटेल चमकला

कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता

तुपकर यांच्या आईने ठणकावले; माझ्या मुलाला काही झाले तर सरकार जबाबदार

वैज्ञानिक तथ्यांना समोर ठेऊन आणि कत्तल केलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा तीन पट झाडे लावण्याच्या अटीवर सर्वोच्च न्य्यालायाने २ हजार ७०० वृक्षांच्या तोडणीला मान्यता दिली होती. मात्र, या सर्वाला विरोध करून मुंबईकरांचा सोयीस्कर होऊ शकणारा प्रवास पुन्हा खड्डे असणाऱ्या रस्त्यात ढकलला आहे, असा टोला अमित साटम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

AMDAR AMIT SATAM

पर्यावरण आपत्तीपासून मुंबईला वाचविण्यासाठी त्वरित मेट्रो प्रश्न मार्गी लावण्याची आणि ३९ हजार झाडांच्या कत्तली करण्याच्या परवानग्या देण्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे.

Exit mobile version