भाजप आमदार अमीत साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्यावर निशाणा साधत पत्रामध्ये हुतात्मा चौकाच्या नामकरणाच्या प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रक्रियेबद्दल अद्याप कोणतीही हालचाल होत नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा झालेल्यांच्या स्मरणार्थ ‘हुतात्मा चौक’ उभारण्यात आला आहे. मात्र त्यास सन्मान देऊन ‘हुतात्मा स्मारक’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शिवसेनेची सत्ता असणाऱ्या महापालिकेने २०१७ साली स्वीकारला होता. त्यानंतर सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करून आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. या गोष्टीला तब्बल ४ वर्षे आणि ६ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र यावर अद्याप काहीही प्रक्रिया झालेली नाही म्हणून अमीत साटम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
हे ही वाचा:
औषध खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवून मुंबईकरांच्या आरोग्याची हेळसांड
वकील महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
केबीसीच्या २१ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणींनी बिग बी भावूक
कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर; विरोधकांचा प्रचंड गोंधळ
ज्या तत्पतेने काळ्या यादीतील कंत्राटदारांना बाहेर काढून परत मुंबईकरांना पैसा लुटण्यासाठी मोकळे रान दिले, तीच तत्परता हुतात्मा स्मारकाच्या नामकरणासाठी का नाही? असा सवाल अमीत साटम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ज्या मराठी अस्मितेचा वापर करत शहरावर २५ वर्षे सत्ता अक्षरशः भोगली, त्या मराठी माणसाचे हाल काय केले गेले आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाचा वापर करत राजकीय स्वार्थ साधून घेता, पण त्यांच्या स्मारकाचे शिवसेनेला स्मरण राहत नाही, असा टोलाही अमीत साटम यांनी शिवसेनेला लगावला आहे.