‘देशात दहा कोटी बांगलादेशी, रोहींग्या घुसखोर मुस्लिम’

सांगली येथे हिंदू एकता आंदोलनाचा मेळावा

‘देशात दहा कोटी बांगलादेशी, रोहींग्या घुसखोर मुस्लिम’

हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने सालाबादप्रमाणे सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपाचे पृथ्वीराजभैय्या पवार व महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

मारुती चौकात झालेल्या या मेळाव्यात सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके म्हणाले की, अखंड भारत देशामध्ये बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार व अन्य देशातून आलेल्या घुसखोर मुस्लिमांची संख्या १० कोटी इतकी आहे. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील संख्या ही ३ लाखापर्यंत आहे. केवळ भाषण बाजी करून आमदार, खासदार निवडून आणून सरकार आणून घुसखोरांना आपल्या देशातून पळवणे शक्य नाही. त्यासाठी NRC सह मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कायदा आणावा लागेल. त्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूनो दबाव आणा. हे कायदे कधी करणार याची विचारणा करा. अन्यथा २०४७ मध्ये हिंदुस्थानात हिंदू अल्पसंख्याक होईल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र घुसखोर मुक्त करण्याचा संकल्प करूया. घूसखोरांच्या विरोधात प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन राबवले पाहिजे. घुसखोरांची तपासणी करा. हिंदू ना टार्गेट केले जात असेल तर पेटून उठले पाहिजे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या खडग्याभोवती झालेल्या अतिक्रमण आणि त्या विरोधात माजी आमदार नितीन शिंदे यांनी २१ वर्ष दिलेला लढा हा ऐतिहासिक म्हणावा लागेल.

हे ही वाचा:

‘नीती एनसीएईआर राज्य आर्थिक मंच’ पोर्टल लॉन्च होणार

झोपताना मोबाईल बघताय, निद्रानाश होणारच

दलाई लामा ‘गोल्ड मर्क्युरी पुरस्कार २०२५’ने सन्मानित

बीड कारागृहात टोळीयुद्ध? वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण?

यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाच्या थडग्यावर लावलेला “हजरत औरंगजेब आलमगीर” नावाचा बोर्ड हटवून त्या जागी “क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे थडगे” नावाचा बोर्ड लावावा. थडग्याचे दगडी बांधकाम सोडून सर्व मार्बलचे नक्षीदार बांधकाम तोडून टाकावे. थडग्यावर गलफ, फुले, चादर चढवण्यास शासनाने ताबडतोब बंदी घालावी. क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे उदात्तीकरण ताबडतोब थांबवावे. औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान आहे.  हा अपमान हिंदू सहन करणार नाहीत.

यावेळी बोलताना ऍड. स्वाती शिंदे म्हणाले की,* हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना रस्त्यावर यावं लागेल. क्रूरकर्मा औरंगजेबाचे नामोनीशाण महाराष्ट्रात राहता कामा नये.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत हिंदू एकता जिल्हाध्यक्ष  संजय जाधव यांनी केले. यावेळी हिंदू एकताचे मनोज साळुंखे, प्रा. विनया कुलकर्णी, अविनाश मोहिते यांची भाषणे झाली. मेळाव्याचे सूत्रसंचालन हिंदू ऐकताचे विजय दादा कडणे यांनी केले.

या मेळाव्यास वीर योद्धा संघटनेचे श्रीकांत रांजणकर, संदीप गिड्डे, हिंदू एकता आंदोलन कार्याध्यक्ष विनायक आण्णा पावसकर, दत्ता भोकरे, राजू जाधव, सोमनाथ घोटखिंडे, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, रवि वादवणे, प्रकाश चव्हाण, प्रसाद रिसवडे, शिवाजी पाटील, विष्णुपंत पाटील, विजय टोणे, दीपक नायडू, सचिन सरगर, अरुण वाघमोडे, अक्षय पाटील, शुभम खोत, अमित सूर्यवंशी आदींसह हिंद एक आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version