लोकल सुरु नसल्यामुळे सर्वसामान्यांचे आता खूप हाल होत आहेत. त्यामुळे आता प्रवासी संघटना ठाकरे सरकारविरोधात चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत. त्यामुळेच आता ठाकरे सरकारला प्रवासी संघटनांनी त्यांच्याच शब्दात आता इशारा द्यायला सुरुवात केलेली आहे.
दोन लसी घेतलेल्यांसाठी लोकलप्रवास मुभा देण्यात यावी म्हणून आता प्रवासी संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत. उपनगरातून मुंबईच्या दिशेने हजारो लाखो लोकांच्या येण्याजाण्यासाठी लोकल हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या आता कार्यालयांमध्ये उपस्थिती सुद्धा अनिवार्य झालेली आहे. त्यामुळे रस्तामार्गे कार्यालय गाठणे अतिशय जिकीरीचे झालेले आहे.
अनेकांनी तर ठाकरे सरकारच्या निर्बंधरुपी नियमांना केराची टोपली दाखवत रेल्वे प्रवास करायलाही सुरुवात केली.
रेल्वे प्रवासी एकता महासंघाच्या वतीने आता ठाकरे सरकारला स्पष्टपणे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लोकलसेवा सुरु नाही झाली तर, सर्वसामान्य माणूसही रस्त्यावर सरकारविरोधात उतरणार हे आता नक्की झालेले आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने काढली लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा
१०६ आमदारांचे निलंबन केले तरी मागे हटणार नाही
ठाकरे सरकारचा धोरणलकवा विद्यार्थ्यांच्या मुळाशी
एमपीएससीचे विद्यार्थी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक
निर्बंधांच्या नावाखाली सरकारने केवळ वेळकाढूपणा करून सामान्यांचे हाल केले आहेत. नुकतेच विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी एक लाख ३१ हजार जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच चार हजार बोगस ओळखपत्रेही जप्त करण्यात आलेली आहे. ठाकरे सरकारने निर्बंध मोडण्यास जनतेस प्रवृत्त केलेले आहे.
आजच्या घडीला बाजारपेठा तसेच इतर अन्य ठिकाणेही सुरु झालेली आहेत. मग लोकलसेवा बंद का असाच सूर आता सामान्य जनता आळवू लागलेली आहे. सामान्यांसाठी लोकल ही केवळ सेवा नाही तर, जीवनवाहिनी आहे. त्यामुळेच आता लवकरात लवकर लोकल सुरू न झाल्यास सामान्यांचा एल्गार पाहायला मिळणार हे आता निश्चित झाले आहे.
सर्व सामान्य माणसाचा अंत पाहू नये असे वाटते