26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणआता गांजाच्या लागवडीस परवानगी द्या!

आता गांजाच्या लागवडीस परवानगी द्या!

Google News Follow

Related

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या निर्णयाला भाजपकडून तीव्र विरोध केला जात असताना, त्यात नांदेडच्या शेतकऱ्यांनी आता राज्य सरकारवर टीका करत गांजाची लागवड करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

नांदेडचे शेतकरी अविनाश अनराये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल करून गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे. ” कोविड आणि राज्यातील काही भागात थंडी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तथापि, आम्हा सर्व शेतकऱ्यांना गांजाची लागवड करण्यास परवानगी दिली पाहिजे आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत केली पाहिजे. ”असे ईमेलमध्ये अनराये यांनी म्हटले आहे.

सरकारने किराणा दुकानात वाइन विक्रीस परवानगी दिली तर शेतकऱ्यांना गांजाची लागवड करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. नवाब मलिक यांचे जावई हर्बल तंबाखूच्या नावाखाली गांजाचे उत्पादन करत असल्याने शेतकऱ्यांना गांजाची लागवड करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सरकारला दारू विक्रीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर ते गांजाचे उत्पादनही करू शकतात. गांजाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल. असे खासदार चिखलीकर नांदेडमध्ये बोलत होते.

हे ही वाचा:

मुंबईमध्ये फक्त भाजपच बदल घडवून आणेल

‘आगामी आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ८ ते ८.५० टक्के राहील’

शिक्षण मंत्र्यांच्या घराला आंदोलक विद्यार्थ्यांनी घेरले

उद्धवजी, राऊत यांच्या वक्तव्यांना आपली संमती आहे काय?

द्राक्ष उत्पादकांना तसेच वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांजवळ वाइन विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलपेक्षा दारू स्वस्त असून काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी उठवल्यानंतर नवीन दारूचे परवाने देण्यात आले आहेत. आता सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीला परवानगी देऊन घरोघरी दारू पोहोचवली जात आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके कोणाचे आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा