लोकल सुरू करा! भाजपाचे सविनय नियमभंग आंदोलन

लोकल सुरू करा! भाजपाचे सविनय नियमभंग आंदोलन

कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी दैनंदिन व्यवहार बंद करून ठेवणार का, असा सवाल करीत लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना सुरक्षा नियमांचे पालन करून लोकल प्रवासासह सर्व कामकाज करण्याची परवानगी देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच आता ठाकरे सरकारने परवानगी न दिल्यास येत्या २ ऑगस्टपासून सविनय नियमभंग आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरु व्हावा याकरता आता भाजपने गांधीगिरीचा मार्ग अवलंबिलेला आहे.

राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर जावे लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो, त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

हे ही वाचा:
लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका

अफगाणिस्तानने ‘असा’ केला पाकिस्तानचा अपमान

व्यापारी वर्गाचे ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलनाचे हत्यार

डोंगरउतारावरील झोपड्यांवर सर्वाधिक धोक्याचे सावट

लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही मुखपट्टी वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळेच आता ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरू करतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत राज्य सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत. सामान्य माणसाला उपनगरी प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे.

Exit mobile version