काँग्रेस कार्यकारिणीत तक्रारीचा सूर
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काँग्रेसने चांगलाच पराभव पत्करला आहे. त्यामुळे त्याचे पडसाद खुद्द काँग्रेसमध्ये देखील उमटू लागले आहेत. काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या ऑनलाईन बैठकीत आसामच्या निवडणुकीत एआययुडीएफ आणि आयएसएफ या मुस्लिम पक्षांसोबत केलेल्या आघाडीवर टीका केली.
ही टीका करण्यात जी-२३ समुहातील दिग्विजय सिंह, गुलाम नबी आझाद यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. जी-२३ हे त्या नेत्यांना संबोधले जाते, ज्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील मूलभूत बदलांचा विचार करावा अशी मागणी सोनिया गांधी यांच्याकडे केली होती.
हे ही वाचा:
कोविड काळात काझीच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी
७० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या पालिकेने मोफत लसीकरणाचा बोजा उचलावा
आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, आमदार रणजीत कांबळेंविरुद्ध तक्रार दाखल
गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये बळी पडलेल्यांचे मृतदेह अजूनही शवागारात
या बैठकीत सिंह यांनी बद्रुद्दीन अजमल यांच्या एआययुडीफ या नव्याने स्थापन झालेल्या पक्षासोबत केलेल्या आघाडीवर टीका केली. त्याचबरोबर पश्चिम बंगालचे प्रभारी जितीन प्रसाद यांनी देखील बंगालमधील पराभवावर त्यांचा अहवाल सादर केला. यात त्यांनी आयएसएफसोबत केलेल्या आघाडीला जबाबदार धरले होते. यावेळी अधिर रंजन चौधरी यांनी या आघाडीची पाठराखण केली.
या महत्त्वाच्या बैठकीला राहुल गांधी मात्र अनुपस्थित राहिले होते. कोविड-१९ मधून अजून पूर्णपणे सावरले नसल्याचे कारण देत राहूल गांधींनी या बैठकीत दिसले नाहीत.
काँग्रेसच्या गुलाम नबी आझादांसारख्या वरिष्ठ नेत्याने देखील अशा प्रकारच्या आघाडीवर टीका केली. त्यांनी अशा प्रकारच्या आघाडीचे निर्णय राज्य स्तरावर घेतले न जाता केंद्रीय कार्यकारणी समितीत घेतले गेले पाहिजेत असे देखील सांगितले. त्याबरोबरच माझ्यासारख्या एखाद्या नेत्याचा सल्ला देखील घेतला जाऊ शकला असता अशी गर्वोक्तीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी अधिक सुसंवादाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.