अमरिंदर सिंग- शेखावत चर्चेत युतीवर चर्चा?

अमरिंदर सिंग- शेखावत चर्चेत युतीवर चर्चा?

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंद्रसिंग शेखावत यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष युती करण्याच्या जवळ असल्याची चर्चा वाढवली. पंजाब भाजपचे प्रमुख अश्विनी शर्मा यांनी दावा केला की त्यांचा पक्ष सर्व ११७ जागांवर लढण्याची तयारी करत आहे.

या बैठकीबाबत दोन्ही पक्षांकडून गुप्तता पाळण्यात आली होती. अमरिंदर सिंग यांच्या सहाय्यकांनी निदर्शनास आणून दिले की ही केवळ या दोन नेत्यांचीच बैठक होती. त्याचबरोबर त्यांनी युतीच्या रूपरेषांवर चर्चा केल्याचा इशारा दिला.

“केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि भाजपा पंजाबचे निवडणूक प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांची आज माझ्या निवासस्थानी भेट घेतली.” असे अमरिंदर सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेखावत यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये शेखावत म्हणाले, “आज कॅप्टन अमरिंदर सिंगजी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंजाबच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

माजी मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना आपण एकत्र असल्याचा संदेश द्यायचा होता, अशी ही स्नेहभोजनाची बैठक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची कल्पना होती असे समजते. “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अमरिंदर यांची भेट बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. आघाडीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पंजाबमधील काँग्रेस नेत्यांना यातून चुकीचा संदेश जात होता. म्हणूनच ही बैठक घेण्यात आली आहे.” असे एका भाजप नेत्याने सांगितले.

हे ही वाचा:

अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार

इम्रान खानच्या ‘नया पाकिस्तान’ची ही दशा

जागतिक सरासरीपेक्षा भारतात १०% जास्त महिला वैमानिक

सीडीएस हेलिकॉप्टर अपघात: राजनाथ सिंग संसदेत माहिती पुरवणार

शेखावत यांनी पंजाब भाजपा नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले. भाजपने ७० जागा लढवण्याचा विचार केला आहे, तर अमरिंदर सिंग यांना ३५ आणि उर्वरित जागा एसएडीला (संयुक्त) दिल्या आहेत.

सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केल्यानंतर कोणत्याही भाजपा नेत्यासोबत अमरिंदर यांची ही पहिलीच भेट आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी पंजाब लोक काँग्रेस हा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.

Exit mobile version