बीडमधील केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये नुकतेच नगरसेवक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर चंदन तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केज नगरपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब जाधव यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई कारखाना परिसरात देवराव कुंडगर यांच्या शेतातून बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे बेकायदेशीररित्या चंदनाची झाडे तोडायचे. या कामासाठी त्यांनी काही लोकांना हाताशी घेऊन त्या परिसरातील चंदनाच्या झाडांची छाटणी करायचे. आणि देवराव कुंडगर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये
तोडलेली झाडे तासून त्यातील चंदन काढून शेडमध्येच लपवून ठेवायचे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
महाभकास आघाडी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा निर्णय
पाकिस्तानमध्ये आणखीन एका मंदिराची तोडफोड
होंडुरासला लाभल्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
ही माहिती सहायक पोलिस पंकज कुमावत यांना मिळाली होती. आणि मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कुंडगर यांच्या शेडमध्ये छापा मारला असता एक व्यक्ती जागीच सापडला तर पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला २७ किलो चंदनाच्या झाडाच्या खोडामधून काढलेला चंदनाचा गाभा पोलिसांना आढळला. त्याची किंमत ६७ हजार ५०० रुपये असून त्या सोबत एक दहा हजाराचा एक मोबाईल देखील आढळला आहे. एकूण ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान, देवराव कुंडगर याला हा माल कोणाचा आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, हा माल बाळासाहेब दत्तात्रय जाधव आणि त्यांचा लेखापाल सतीश यांचा असून, त्यांच्या विनंतीवरून तो इथे ठेवल्याचे कुंडगर याने सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.