आयएनएस विक्रांत प्रकरणासंबंधित भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात न्यायालयात पुढची सुनावणी होणार आहे. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी न्यायालयावर विश्वास असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ठाकरे सरकारने माझ्यावर बारा आरोप केले होते. ते आरोप ठाकरे सरकार सिद्ध करू शकलेले नाही. ५७ कोटींच्या आरोपात ठाकरे सरकार ५७ पैशाचासुद्धा पुरावा देऊ न शकल्याची टीका सौमय्यांनी केली आहे. ते म्हणाले, माझ्यावर जे ठाकरे सरकारने १२ आरोप केलेत त्याचे पुरावे द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आरोप आहेत. त्यांच्या या आरोपांचे उत्तर मी त्यांना देणारच आहे. आयएनएस विक्रांत कथित घोटाळ्यासंबंधी पुढची सुनावणी होणार आहे. मात्र माझा न्यायालयावर विश्वास आहे. मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढत असल्याने त्यांनी मला मारण्याच्या धमक्या दिल्या असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत फक्त सत्तेचे ‘भोगी’
काय अर्थ आहे शनीच्या कुंभ राशीप्रवेशाचा ?
योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले
पुढे सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर १२ आरोप केले आहेत त्यापैकी अकरा आरोपामध्ये एका पैशाचाही गैरव्यवहार उद्धव ठाकरेंना सापडला नाही. आमचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकार कामाला लागले पण मी आयुष्यात दमडीचाही भ्रष्टाचार केल्या नसल्याने ते तोंडावर पडले आहेत. तसेच उच्च न्यायालयाने पोलिसांना सहकार्य करा असे आम्हाला सांगितले होते. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत आणि यापूर्वीही केले आहे. आम्हाला पोलिसांनी जी माहिती विचारली आहे ती माहिती आम्ही त्यांना दिली आहे. त्यासंदर्भात आज पुढील सुनावणी होणार आहे, असेही सोमय्या म्हणाले.