ऊर्जामंत्री राऊत यांच्या कार्यालयावर ठपका
गेल्या वर्षी वीजबिलांवरून टीकेचे लक्ष्य ठरलेले राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आता आपल्या कार्यालयातील डायरीच्या घोटाळ्यावरून लक्ष्य बनले आहेत. मंत्र्यांच्या वैयक्तिक प्रचारासाठीच्या डायऱ्यांचा खर्च महावितरणच्या तिजोरीतून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात होता, पण त्यासाठी झालेला ५ लाखांचा खर्च विनानिविदा असल्याने तो नामंजूर केला गेला. महावितरणच्या वित्त विभागानेच त्यावर आक्षेप घेत फुली मारली.
ऊर्जामंत्री राऊत यांच्या कार्यालयीन कामासाठी सामग्री हवी असल्याचे पत्र राऊत यांच्या खासगी सचिवांनी महावितरणकडे पाठवले. त्यात ५०० डायऱ्यांचाही समावेश होता. कार्यालयाने त्या डायऱ्या छापल्या आणि त्याचे ४ लाख ९८ हजारांचे बिल वित्त विभागाकडे पाठवले. पण तीन लाख रुपयांवरील खर्चासाठई निविदा हव्यात असे सांगून त्यावर आक्षेप घेतला गेला. या खर्चासाठी निविदा का काढण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
हे ही वाचा:
बनावट फेविपिरावीर औषधाचा साठा एफडीएकडून जप्त
फडणवीसांचे वादळ अडविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न
मनसुख हिरेनप्रकरण भोवले; चौथा पोलीस अधिकारीही सेवेतून बडतर्फ
मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी
वित्त विभागाची तत्त्वतः मंजुरी घेणेही आवश्यक होते. पावतीवर जो दर आहे तो बाजारभावानुसार पडताळण्यात आलेला नाही असा आक्षेपही घेण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या या वृत्तानुसार राऊतांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
कोरोनाच्या काळात कुठल्याही सरकारी विभागाने कॅलेंडर, शुभेच्छापत्रे यासाठी खर्च करू नये असे आदेश दिलेले आहेत. या निर्देशांचेही उल्लंघन करण्यात आले आहे.
ठाकरे सरकार म्हणजे फक्त घोटाळे, बाकी काही कामच नाही… @OfficeofUThttps://t.co/NpozE7k4jb
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 1, 2021
यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकार फक्त घोटाळेच करत आहे की काय? बाकी काही कामच नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.