राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची एक कथित ऑडियो क्लिप सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. महिला अत्याचाराचा आरोप असणारा एक इसम थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मदत मागायला जातो असा उल्लेख या ऑडियो क्लिप मध्ये करण्यात आला आहे. तर आरोप करणारी मुलगी ‘मरू दे’ अशा प्रकारचे संभाषण या क्लिप मध्ये ऐकायला मिळत आहे. या क्लिपमुळे खळबळ उडाली असून ‘साहेबांच्या’ महिला धोरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मल्लीकार्जुन पुजारी नावाच्या व्यक्तीला एका साहेबांच्या कार्यालयातून फोन जातो. नंतर स्वतः साहेब फोनवर बोलू लागतात. या साहेबांचा आवाज मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांमधील संभाषण पुढील प्रमाणे आहे.
साहेब:- ए मल्लीकार्जुन तु कुठल्या तरी माणसाला ब्लॅकमेल करतोयस एका पोरीवरून
मल्लीकार्जुन:- तुमच्याकडे आले का ते?
साहेब:- अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल पटेलकडे गेले
मल्लीकार्जुन:- साहेब ब्लॅकमेल करत नाही. ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आली होती
साहेब:- भो** गेली ती…काहीतरी करतो नको ते उद्योग
मल्लीकार्जुन:- मी काय केलं साहेब? मी थोडी त्याला ब्लॅकमेल केलं?
साहेब:- अरे टी सिरिजचा मालक आहे तो समोरचा माणूस
मल्लीकार्जुन:- अहो साहेब मला माहित्ये..ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती.
साहेब:- अरे जाऊ दे मरू दे तिला. तू फुकट कशाला बदनाम होतोय त्यामध्ये?
मल्लीकार्जुन:- मी काय बोललो का साहेब? तोच मला बोलला, त्या मुलीला गुन्हा दाखल करू देऊ नका. मी म्हटलं मी काय समजावणार. तुझं काय असेल तर तू येऊन भेटून घे ना नवी मुंबईमध्ये
साहेब:- तू त्यांच्या मधे पडू नको. त्याला सांग तुझे तू बघ.
मल्लीकार्जुन:- ठीक आहे साहेब.
हे ही वाचा:
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर
पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक
थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना ‘बेस्ट’ बसेसचा ठेंगा
या संभाषणा नंतर ही ऑडियो क्लिप संपते. या ऑडियो सध्या सोशल मीडियावर ही ऑडियो क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. यामुळे नेटकरी अनेक सवाल उपस्थित करताना दिसत आहेत. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील या प्रकरणात टीकास्त्र डागले आहे. ‘हेच आहे साहेबांचे महिला धोरण’ अशी उपरोधीक टीका त्यांनी ट्विटरवरून केली आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे बलात्कार प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी
पीडितेला मदत करणाऱ्याला धमकी देत असल्याची ऑडिओ टेप @JaiMaharashtraN हाती आली आहे. हेच आहे साहेबांचे महिला धोरण.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 3, 2021