राममंदिर परिसरातील जमीनखरेदीवरून काँग्रेस आणि शिवसेनेने केलेले आरोप अखेर बोगस निघाले, अशी खरमरीत टीका भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहेत.
आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्या नेत्यांनी या जमीनखरेदीत घोटाळा झाल्याचा धुरळा उडवला, पण त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राम जन्मभूमी ट्रस्टने या जमिनीचा खरेदी करार आणि करारातील सविस्तर तपशील जाहीर केल्यानंतर विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत.
हे ही वाचा :
सोशल मीडियावर महिलांना त्रास देणारा अडकला हनीट्रॅपमध्ये
संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची केली हत्या
ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळतंय
मुंबई क्रिकेटचे दरवाजे अंकितसाठी उघडणार?
याबाबत भातखळकर यांनी म्हटले आहे की, राममंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेनेने केलेले आरोप बोगस होते, हे आता उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेस चरणचाटण खुशाल करा, पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे, हे लक्षात ठेवा.
राममंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी @ShivSena कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेनाआदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे.
सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. #JaiShriRam pic.twitter.com/zuWh9DRnT9— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
रामजन्मभूमी ट्रस्टने या आरोपासंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण केल्यानंतर मात्र आरोप करणारे मूग गिळून गप्प आहेत. या करारात नऊ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या संमतीनेच पारदर्शकपणे जमिनीचा करार पूर्ण करण्यात आला. सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आणि कराराची अधिकृत नोंद करण्यात आली.
ही जमीन खरेदी करण्यास प्रथम न्यासाला स्वारस्य होते. परंतु, जमिनीची मालकी स्पष्ट व्हावी यासाठी न्यासाला यापूर्वीच्या करारांना अंतिम स्वरूप द्यायचे होते. गेल्या १० वर्षांपासून या व्यक्ती करारात सहभागी आहेत. त्यांच्याशी संवाद साधूनच करार करण्यात आला. जमिनीच्या अंतिम मालकांसमवेत पारदर्शक पद्धतीने करार केला गेला. या कराराअंतर्गत देण्यात आलेली रक्कम ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली आहे. शिवाय, ज्या ठिकाणी ही जमीन आहे, त्या जागेचा दर प्रत्यक्ष दरापेक्षाही कमी आहे, हे स्पष्ट झाले आहे.