32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारण“बाळासाहेबांचे विचार गुंडाळल्यामुळेचं उद्धव ठाकरेंसमोर अल्ला हो अकबर, टिपू सुलतानचे नारे”

“बाळासाहेबांचे विचार गुंडाळल्यामुळेचं उद्धव ठाकरेंसमोर अल्ला हो अकबर, टिपू सुलतानचे नारे”

अहमदनगरमधून देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूकीचा तिसरा टप्पा सुरू असतानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगरमध्ये सभा घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, मतदानाची महाराष्ट्रातली टक्केवारी कमी आहे. वाढतं तापमान हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. पण, तरीही मतदारांना विनंती आहे की लोकशाहीसाठी सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, “२००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर दहशतवादी कसाबने गोळ्या झाडल्या नसून आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता.” त्यानंतर यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले की, “विजय वडेट्टीवर जे बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? काही मतांच्या लांगूलचालनासाठी उद्धव ठाकरे तोंड शिवून बसले आहेत. उज्ज्वल निकम यांच्याविषयी बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका मांडली होती, त्यांचं अभिनंदनही केलं होतं. आज उद्धव ठाकरेंचे पार्टनर उज्ज्वल निकमांवर टीका करत आहेत. मतांसाठी उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत,” अशी घाणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

“हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्यपद्धती उद्धव ठाकरेंनी गुंडाळून ठेवली आहे. त्यामुळेच त्यांच्या समोर अल्ला हो अकबरचे, टिपू सुलतान जिंदाबादचे नारे सुरु आहेत. जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं आहे. तसंच त्यांनीही जी बाळासाहेबांची परंपरा होती माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणायचे ते देखील उद्धव ठाकरेंनी म्हणणं सोडून दिलं आहे,” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हे ही वाचा:

दिव्यांगांची सहल; शिरगाव किल्ला, केळवा बीचची केली सफर

पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!

सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड

कसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!

दोन दिवसांपूर्वी झालेल्या बारामतीमधील सभेत आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले होते. यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले आहे. “रोहित पवारांना जे अश्रू अनावर झाले त्याबाबत काय बोलायचं; जनताचं बोलते आहे. भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे त्याबाबत जनताचं काय तो निर्णय घेईल. बारामतीत सगळ्यांनी शांतता राखावी आणि इमोशनल अत्याचार करु नये,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा