एक मार्चपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोविडची लस

एक मार्चपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोविडची लस

कोव्हिड-१९ योद्ध्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच १ मार्चपासून ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

आता खासगी केंद्रांवरही लस उपलब्ध होणार 

ही लस सरकारी रुग्णालयात मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. दहा हजार सरकारी, तर वीस हजार खासगी केंद्रांवर कोरोना लस उपलब्ध असेल, असेही ते म्हणाले. ४५ वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींना सरकारी केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोव्हिड लस घ्यायची असेल, त्यांना लसीचे पैसे मोजावे लागतील. त्या लसीचे दर केंद्रीय आरोग्य मंत्री येत्या तीन-चार दिवसात रुग्णालय प्रशासनांशी बोलून ठरवतील, अशी माहितीही जावडेकरांनी दिली.

हे ही वाचा:

राज्यात लसीकरण मोहीमेचे तीन तेरा

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु आहे. जवळपास साडे सहाशे  केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण पाच लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात पन्नास वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

Exit mobile version