राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलेला आहे. हा सगळा तिढा सोडवण्यासाठी २९ जून म्हणजे शनिवारी राज्य सरकारकडून मुंबईत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले जाणार आहे. याशिवाय, राज्यातील ओबीसी नेते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीसाठी बोलावले केले जाणार आहे. त्यामुळे २९ जूनच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या बैठकीत ओबीसी नेते आणि राज्य सरकारची भूमिका काय असणार याकडे नजरा असणार आहेत.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथील उपोषणावेळी ओबीसी प्रवर्गातून इतर कोणालाही आरक्षण दिले जाणार नाही, याची लेखी हमी सरकारे द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर २९ जूनच्या बैठकीत चर्चा होणार आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी मनोज जरांगे यांनी १३ जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे. यापूर्वी राज्यात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाले होते तेव्हा राज्य सरकारने अशाचप्रकारे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.
हे ही वाचा:
“१९७५ ला लागू झालेली आणीबाणी म्हणजे काळा अध्याय”
मद्य धोरण तातडीने मंजूर व्हावे, अशी केजरीवालांची इच्छा होती
रेल्वेमधील वरची सीट अंगावर पडल्याने केरळमधील व्यक्तीचा मृत्यू
पंतप्रधान मोदी यांचा मुलाखतीतील दावा ठरला खरा
सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आठ दिवसांनी ओबीसी नेत्यांनी उपोषण स्थगित केले होते. यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे बुधवारपासून राज्यातील विविध भागात तीन दिवसीय अभिवादन दौऱ्यावर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला. यानंतर बंजारा समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या पोहरादेवी मंदिर तसेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्मृतिस्थळ असलेल्या गोपीनाथ गड आणि भगवानगडासह चौंडी येथे देखील त्यांनी भेट दिली.