राज्याच्या राजकारणात रविवारी, ३ जुलै रोजी राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीमधील अनेक खासदार आणि आमदार अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते. शिवाय अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसपक्ष चिन्हावर दावा सांगितला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथविधीला हजर राहिलेल्या सर्व नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्रक काढून हा आदेश जारी केला आहे. रविवारी, २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. नरेंद्र राणे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना… pic.twitter.com/3PIMG2OLSh
— NCP (@NCPspeaks) July 3, 2023
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकार मध्ये सामील होणाऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्यांना पक्षातून बडतर्फ करीत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल!
खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट
विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?
आधी नितीश, केजरीवाल, नंतर महाराष्ट्र विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडे
शपथविधीला उपस्थित राहून हे कृत्य पक्षशिस्त तसेच पक्षाची ध्येय धोरणे यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाशी संगत नाही आणि त्यामुळे ही बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येत आहे, असं राष्ट्रवादीच्या पत्रकात म्हटलं आहे. तसेच बडतर्फ केलेल्यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव चिन्ह वापरता येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना या पत्रात करण्यात आले आहेत.