जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी काळातील अनेक निर्णय रद्द करण्याचा धडाका या सरकारने लावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी काळातील अनेक निर्णय रद्द करण्याचा धडाका या सरकारने लावला आहे. आता शिंदे- फडणवीस सरकारने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या काळात घेण्यात आलेले म्हाडा संदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

गृहनिर्माण खातं सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. जितेंद्र आव्हाडांच्या काळात घेण्यात आलेले म्हाडा संदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह गृहनिर्माण विभागाशी संबंधित सर्व निर्णय म्हाडा आणि विभागीय मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व अधिकार म्हाडा तसेच विभागीय मंडळांना देण्यात आल्याने म्हाडाला यापुढे कोणताही निर्णय घेताना सरकारवर अवलंबून रहावे लागणार नाही.

हे ही वाचा:

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार

मुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार

‘प्रिन्स चार्ल्स पायउतार होतील’ कोण म्हणतंय असं

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी होती. महाविकास आघाडीच्या काळात आव्हाड यांनी अनेक निर्णय घेताना म्हाडा बाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी म्हाडाचे सगळे अधिकार काढून घेत ते सरकारकडे ठेवले होते. त्यामुळे म्हाडाचे काम फक्त प्रस्ताव तयार करणे आणि ते सरकारकडे पाठवण्याचे एवढेच काम ठेवले होते.

Exit mobile version