विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने दिला महाविकास आघाडीला धोबीपछाड; पाचही उमेदवार विजयी

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने दिला महाविकास आघाडीला धोबीपछाड; पाचही उमेदवार विजयी

राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडीला जोरदार धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार या निवडणुकीत विजयी ठरले आणि राज्यसभा निवडणुकीसारखाच चमत्कार भाजपाने करून दाखवत महाविकास आघाडीत समन्वय नाही, हे दाखवून दिले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती या साऱ्या निवडणूक प्रक्रियेत यशस्वी ठरल्याचे दिसून आले. भाजपाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी ठरले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपाने ११३ मते हाताशी असतानाही तब्बल १३३ मते मिळवित महाविकास आघाडीला भगदाड पाडले.

या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात उतरले होते आणि पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी विजय मिळविला पण त्यांच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येच फाटाफूट असल्याचे सिद्ध झाले. पहिल्या पसंतीची मतेही काँग्रेसच्या उमेदवारांना पूर्ण मिळविता आली नाहीत तिथेच त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव निश्चित झाला.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज, २० जून रोजी निवडणूक पार पडली. या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले होते. सहा उमेदवार महाविकास आघाडीचे होते तर पाच उमेदवार भाजपाचे होते. भाजपाकडे पुरेसे संख्या बळ नसतानाही भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तर काँग्रसेचे पहिल्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप हे विजयी झाले आहेत. तर काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.

हे ही वाचा:

अनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

रेणू शर्मा खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुंडेंना ब्रेनस्ट्रोक

मलिक, देशमुखांची ‘सर्वोच्च’ निराशा

राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे विधान परिषदेतही देवेंद्र फडणवीस यांची रणनीती कामी येणार का आणि विधान परिषदेत गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याकडे लक्ष लागून होते.

कोणते उमेदवार विजयी

Exit mobile version