23 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरराजकारणबदलापुरात शिवसेनेत फूट; सर्व नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंसोबत

बदलापुरात शिवसेनेत फूट; सर्व नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंसोबत

Google News Follow

Related

ठिकठिकाणी शिवसेनेला खिंडार

शिवसेनेमधील गळती अजूनही सुरू असून उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसला आहे. कुळगाव बदलापूर नगर पालिकेतील शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.

कुळगाव बदलापूर नगर पालिकेत शिवसेनेचे २४ नगरसेवक निवडून आले असून तीन स्वीकृत नगरसेवक आहेत. या सर्व नगरसेवकांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरमधील वामन म्हात्रे गट हा संभ्रमात होता. शुभेच्छा बॅनरवर देखील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरण्यात आले होते, अशा परिस्थितीत अखेर शनिवारी सकाळी म्हात्रे गटाने आपल्या नगरसेवकांसह शिंदे गटाला समर्थन दर्शवले आहे.

हे ही वाचा:

रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

असंसदीय शब्दानंतर आता उपोषण, धरणेवरून विरोधकांचे रडणे!

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

वामन म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात गेल्याने बदलापुरात शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा उभी फूट पडल्याचे चित्र आहे. नगरसेवकांसोबतच शहरातील अनेक पदाधिकारी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ११ नगरसेवकांचा पाठिंबा

दरम्यान रत्नागरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड येथील एकूण ११ नगरसेवकांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या 20 नगरसेवकांनी आमदार उदय सामंत यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐकूण ३१ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

पालघरमध्ये ५० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

पालघर जिल्ह्याचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्यासह शिवसेनेच्या ५० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोकणापाठोपाठ आता पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडल्याच दिसत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.वसई – विरार मनपातील पाच नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, विक्रमगड नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवक आदींनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीच्या सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगावात गुलाबराव पाटील समर्थक शिंदे गटात

जळगावमध्येही माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावमधील धरणगाव तालुका हा विधेनसभेच्या जळगाव मतदार संघात येतो आणि हा मतदार संघ माजी मंत्री गुलाब राव पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे जळगावमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
202,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा