27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरराजकारणमुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार

मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार

उदय सामंत यांची माहिती

Google News Follow

Related

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली होती. अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित होतं आहेत. यावेळी मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याचे दिसले. त्यामुळे आज दिवसभरात कामकाज वादळी होणार हे दिवसाच्या सुरुवातीलाच स्पष्ट झालं. यादरम्यान, मुंबईतल्या गोखले ब्रीजचा प्रश्न अधिवेशनात मांडण्यात आला. हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला करण्यात येणार, याबद्दलही विचारणा करण्यात आली.

उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, या पुलाची पहिली लेन मार्च २०२३ मध्ये सुरू करण्यात येईल. तर दुसरी लेन डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होणार आहे. यादरम्यान आदित्य ठाकरेंनी या पुलाविषयीच्या दोन अहवालांचाही उल्लेख केला. कोणत्या राजकीय पत्रामुळे हा पूल बंद केला का, याबद्दल चौकशी करण्याची मागणीही आदित्य ठाकरेंनी केली. या अहवालांबाबत आपण माहिती घेऊ, असं उदय सामंत यांनी म्हटले. तसेच मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

हे ही वाचा:

अर्जेंटिनाच्या विजयावर अतिउत्साही चाहत्याचा हवेत गोळीबार, एकजण ठार

कर्जमाफीचे आश्वासन पाळा म्हणत काँग्रेसच्या पदयात्रेत शेतकऱ्यांचे आंदोलन

एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होणार?

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ जणांना अटक

अधिवेशनातसुद्धा अर्जेंटिनाच्या विजयाची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिओनेल मेस्सीचा उल्लेख केला आहे. फुटबॉल विश्वचषकच्या अंतिम सामन्यात मेस्सीनं कमाल केली. पण मेस्सी एका दिवसात घडलेला नाही. अर्जेंटिनाचा जगज्जेता संघ उभा करण्यात जिद्द, चिकाटी, मेहनत अशा सगळ्याच गोष्टी आहेत. अशी उदाहरणं अनेक आहेत. कोणत्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी, मेहनत या गोष्टी आपण टाळू नयेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा