उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झाला. त्यानंतर युपीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. त्यातच आता प्रगतशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल यादव यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून याबाबत मोठे संकेत दिले आहेत. शिवपाल यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली होती. योगींची भेट घेतल्यानंतर शिवपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना ट्विटरवर फॉलो केले आहे.
ट्विटरवरील या हालचालींवरून पुरोगामी समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपाल मोठा निर्णय घेऊ शकतात, याचा अंदाज बांधला जात आहे. शिवपाल भाजपामध्ये प्रवेश करतील या बातमीला आता राजकीय रंग चढू लागला आहे. शिवपाल यादव यांच्या या कृतीने राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी, शिवपाल यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त होते, त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली. शिवपाल यांनी इटावाहून दिल्लीला जाताना माजी आमदार हरी ओम यादव यांचीही भेट घेतली होती. विशेष म्हणजे हरिओम हे शिवपाल यांचे नात्यातील मित्र असून सपाशी संबंध तोडून ते भाजपामध्ये गेले आहेत, त्यामुळे मित्र भाजपात गेला यावरून शिवपाल भाजपामध्ये जातील असेही बोललं जात आहे.
विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर माजी कॅबिनेट मंत्री शिवपाल सिंह यादव यांनी बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या बैठकीला त्यांनी शिष्टाचार म्हटले असले तरी पुन्हा भेट घेऊ असेही या भेटीतून संकेत आले आहेत.
हे ही वाचा:
वसईत एका वकिलाच्या घरावर धर्मांध मुस्लिमांकडून दगडफेक, गाडीची तोडफोड
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांचे लोकार्पण
….म्हणून दिल्लतील यूएस दूतावासाबाहेर लोकांनी पोस्टर चिकटवले
अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी
शिवपाल यादव हे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचे काका आहेत. सध्या शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांचा आकडा छत्तीस आहे. शिवपाल यादव यांच्या सहा वर्षांपूर्वी सपाच्या अंतर्गत वादानंतर स्वतःचा पक्ष सुरू केला. मात्र, शिवपाल यादव यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकदा शिवपाल यादव मुलायम सिंह यांच्या सांगण्यावरून समाजवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. पण, हवा तसा त्यांना मान मिळाला नाही, त्यानंतर त्यांनी संतापून मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली. तेव्हापासून शिवपाल यादव भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे.