25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणबहराइच घटनेवर तोंड बंद; अखिलेश यांचा हिंदूविरोधी डीएनए दिसतो!

बहराइच घटनेवर तोंड बंद; अखिलेश यांचा हिंदूविरोधी डीएनए दिसतो!

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा निशाणा

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी बहराइच घटनेवर मौन बाळगल्याबद्दल समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. मुस्लीम मते जपण्यासाठी त्यांनी बहराइच प्रकरणावर भाष्य करणे टाळले. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांचा हिंदूविरोधी डीएनए दिसून येतो, असं गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.

गिरीराज सिंह यांनी दावा केला की, अखिलेश यादव यांचा डीएनए हिंदूविरोधी आहे कारण त्यांचे दिवंगत वडील आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी १९९० मध्ये पोलिसांना कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. केवळ मतांसाठी अखिलेश यादव यांनी बहराइचवर एक शब्दही उच्चारला नाही. त्यांचा डीएनए हिंदूविरोधी आहे, असं म्हणत गिरीराज सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र डागले.

इंडी आघाडीच्या इतर नेत्यांवरही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, “तेजस्वी यादव बहराइचवर एक शब्दही बोलणार नाहीत. राहुल गांधी, तेजस्वी यादव किंवा अखिलेश यादव बंगालवर भाष्य करणार नाहीत आणि हे सर्व मुस्लिम मतांसाठी सुरू आहे.” गिरीराज सिंह यांनी एएनआयशी संवाद साधताना विरोधकांवर टीका केली. बहराइच प्रकरणातील चकमकीवर बोलताना सिंह म्हणाले की, अशा गुन्हेगारांना अशीचं शिक्षा मिळावी. अखिलेश यादव हे अशा गुन्हेगारांना हार घालतील.

हे ही वाचा:

५ कोटी न दिल्यास सलमानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट करण्याची धमकी

राजकोट पुतळा प्रकरण: पुतळ्याचे वेल्डिंग करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक

हमासचा म्होरक्या सिनवरच्या खोपडीचा इस्रायलने घेतला वेध

राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची हत्या एसआरएच्या वादातूनच ?

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आरजेडीची संवाद यात्रा काढल्यानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह शुक्रवारी हिंदू स्वाभिमान यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यांच्या हिंदू स्वाभिमान यात्रेच्या आधी, गिरीराज सिंह यांनी बिहारमधील भागलपूर येथील वृद्धेश्वर नाथ मंदिरात नमन केले आणि प्रार्थना केली. हिंदू स्वाभिमान यात्रेवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, “मी हिंदू म्हणून जन्मलो आणि हिंदू म्हणूनच मरणार. मरण्यापूर्वी हिंदूंना एकत्र आणणे हे माझे ध्येय आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा