लसीबाबत दुटप्पीपणा करणारे अखिलेश घेणार लस

लसीबाबत दुटप्पीपणा करणारे अखिलेश घेणार लस

मोदीद्वेषापायी लसीकरणाला विरोध करणारे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचे डोळे आता उघडले आहेत. केंद्र अखिलेश यादव यांनी जानेवारी महिन्यात लसीच्या विरोधात विधाने करत, ही भाजपाची लस असल्याचा दावा केला होता.  शिवाय आमचे सरकार आल्यावरच आम्ही लस घेऊ ही भाजपाची लस घेणार नाही असेही सांगितले होते. पण आता कोलांटउडी मारत आम्ही भाजपाच्या लसीविरोधात होतो, मात्र भारत सरकारची लस आम्ही घेणार आहोत, असे सांगितल्यामुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.

आम्ही लसी देखील घेऊ आणि लस घेण्यास आवाहन करू, असे ट्विट करत त्यांनी स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी मुलायम सिंग यांना खासगी रुग्णालयात कोरोनाची लस दिली गेली. मुलायम यांच्या भाषणाबरोबरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटला टॅग करत म्हटले आहे की हा एक चांगला संदेश आहे, अशी आशा आहे की सपाचे कार्यकर्ते आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षही त्यांच्या पक्षाच्या संस्थापकाकडून प्रेरणा घेतील.  अखिलेश यादव यांनी माफी मागावी, असे ट्विट उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले आहे. या लसीबाबत अफवा पसरविण्याचे काम त्यांनी केले आहे असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचे ₹१५०० अजून सांगलीला पोचलेच नाहीत?

ठाकरे सरकारकडून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक

मोदींच्या घोषणेने ग्लोबल टेंडरची हवाच काढली

२० जुलैला जेफ बेझोस अंतराळात झेप घेणार

अखिलेश यादव यांच्या या बदललेल्या भूमिकांवर आता सर्व स्तरांवरून टीका होत आहे.

Exit mobile version