“दहशतवादाचा आरोपी उमर खालिदचे वडिल आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यात एक गुप्त करार झाला असून खालिदचे वडील समाजवादी पक्षच्या हितासाठी काहीतरी षडयंत्र रचत आहेत.” असा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
भाजपाच्या सामाजिक प्रतिनिधी संमेलनांना संबोधित करताना आदित्यनाथ म्हणाले, “विरोधी पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात. अलीकडेच समाजवादी पक्षाकडे भेटायला कोण आले हे तुम्ही पाहिलेच असेल, भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्या उमर खालिदचे वडिल समाजवादी पक्षाकडे गेले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, “ती व्यक्ती (खालिदचे वडील) समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांना भेटायला येते आणि त्यांना आश्वासन देते की ते पक्षासाठी षडयंत्र रचत आहेत म्हणून काळजी करू नका. जर हे लोक (सत्तेवर) आले तर तुम्ही काय अपेक्षा करू शकता?”
हे ही वाचा:
चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोविड केसेस पुन्हा वाढल्या
करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग
पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले
१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आलेल्या खालिदवर गेल्या वर्षी ईशान्य दिल्लीत दंगल घडवून आणल्याच्या आरोपाखाली यूएपीए (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की आधीच्या काँग्रेस, सपा किंवा बसपा सरकारांनी जातीवादाच्या नावाखाली सामाजिक समरसता बिघडवली आणि राज्याला दंगलीच्या आगीत भिरकावले.