अखिलेश यादव यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भुताने पछाडले!

प्रमोद कृष्णम यांचे विधान

अखिलेश यादव यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भुताने पछाडले!

सनातन धर्माबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करणारे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर भाजपकडून हल्लाबोल करण्यात येत असून आता काँग्रेस नेत्यानेही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर स्वामी प्रसाद मौर्य यांचे नाव घेऊन खरपूस समाचार घेतला आणि अखिलेश यादव यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भुताने पछाडले असल्याचे म्हटले आहे.

गाझियाबादमध्ये एएनआएशी बोलताना प्रमोद कृष्णम म्हणाले की, अखिलेश यादव हे स्वामी प्रसाद मौर्य यांना घाबरतात आणि ते सर्व नष्ट करून टाकतील हे माहिती असूनही त्यांची काय मजबुरी आहे हे कळत नाही.ते पुढे म्हणाले, समाजवादी पक्ष आणि स्वामी मौर्य यांची कथा विक्रम वेताळसारखी आहे.अखिलेश यांच्यावर स्वामी प्रसाद मौर्य यांचे भूत सवार झाले आहे. जर मौर्य यांची धर्माबाबत अशी बेताल वक्तव्ये सुरु राहिल्यास उत्तर प्रदेशमध्ये भाजपा निवडून येईल, हे अखिलेश यांनी माहित आहे, असे प्रमोद कृष्णम म्हणाले.

हे ही वाचा:

मोदी युग भारताला वैभवाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल

हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगातला कैदी; भोगतोय ७८ वर्षांची शिक्षा

राहुल गांधींच्या न्याय यात्रेला सुरुवात होण्याआधीच मणिपूर सरकारचा मैदान देण्यास नकार!

राममंदिर प्राणप्रतिष्ठा, शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार

दरम्यान, २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी १९९० मध्ये कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचे समर्थन केले आहे.कासगंजमध्ये पत्रकारांशी बोलताना स्वामी मौर्य म्हणाले की, अराजकवाद्यांनी जी तोडफोड केली होती आणि तत्कालीन सरकारने(मुलायम सिंह यादव) संविधान आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी जो गोळीबार केला होता, ते सरकारचे कर्तव्य होते आणि सरकारने आपले कर्तव्य पार पाडले, असे ते म्हणाले होते.

 

Exit mobile version