अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!

काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अखिलेश यादव

अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा मुद्दा अजूनही अडकला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही जागांबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सपाने अलीकडेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला ११ जागांची ऑफर दिली होती.मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशमध्ये जागा वाटपांवरून अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या आहेत, परंतु यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

या चर्चेदरम्यान अखिलेश यादव यांनी मोठे विधान केले आहे.जोपर्यंत जागावाटपाचा निर्णय होत नाही तोपर्यंत समाजवादी लोक राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नाहीत, असे अखिलेश यादव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.विशेष म्हणजे, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज सोमवारी अमेठी येथे पोहचली.या यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार होते मात्र ते आता यामध्ये सहभागी होणार नाहीयेत.

सध्याचे राजकीय वातावरण पाहिले तर विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीला सध्या उतरती कळा लागल्याचे दिसत आहे.अनेक मंत्री, बडे नेते, खासदार , आमदार आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.नुकतेच काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील भाजपचे कमळ हाती धरले.पक्षाची भूमिका पटत नसल्याचे आणि पंतप्रधान मोदींचे काम पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.दरम्यान, अखिलेश यादव यांनी देखील आपला सुर वाढवला आहे.काँग्रेसने जागावाटपाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

६०० गायींची कत्तल, होम डिलिव्हरी, अलवरच्या बीफ मार्केट मधील खुलासा!

कमलनाथ भाजपमध्ये जाणार नाहीत, मात्र नकुलनाथ जाण्याची शक्यता!

टाटा समूहाचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त!

नॅशनल कॉन्फरन्सनंतर पीडीपीही ‘इंडिया’तून बाहेर

काँग्रेसच्या न्याय यात्रेत सहभागी होताना मीडियाशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, जोपर्यंत जागा वाटल्या जात नाहीत, तोपर्यंत समाजवादी पक्ष त्यांच्या न्याय यात्रेत सहभागी होऊ शकणार नाही. ते म्हणाले की, काँग्रेससोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.तिकडून अनेक याद्या आल्या आणि इकडूनही अनेक याद्या गेल्या.त्यामुळे जोपर्यंत जागा निश्चित होत नाहीत, तोपर्यंत समाजवादी पक्ष या यात्रेत सहभागी होणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.

 

Exit mobile version