उ.प्र.मध्ये सपाला उभारी देण्यासाठी अखिलेश आणि आझम खान यांनी खासदारकी सोडली

उ.प्र.मध्ये सपाला उभारी देण्यासाठी अखिलेश आणि आझम खान यांनी खासदारकी सोडली

समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव आणि सपा नेते आझम खान यांनी आज लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश हे यूपीच्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. तर आझम हे रामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. आझम खान सध्या सीतापूर कारागृहात आहे. तुरुंगात असताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश करहल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आणि आझम खान हे रामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून योगी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. त्यामुळे सपाला विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागणार आहे. आज अखिलेश यादव आणि तुरुंगात असलेले सपा नेते आझम खान यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

अखिलेश यादव आता विधानसभेत विरोधक म्हणून भूमिका बजावणार आहेत. २०२४ ला होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ह्या दोन नेत्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. सपा सध्या फक्त उत्तर प्रदेशच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार करत आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम

‘गली बॉय’ फेम रॅपर ​​धर्मेश परमारचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक

गोवंशाची कत्तल करणाऱ्या टोळीचा गोरक्षकांनी केला पर्दाफाश

दरम्यान, २०१९ मध्ये अखिलेश यादव जेव्हा खासदार म्हणून निवडून आले तेव्हापासून ते जास्त वेळ दिल्लीत असायचे. यामुळे त्यांच्यावर अनेकदा उत्तर प्रदेशकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे आता दिल्लीचे राजकारण करण्याऐवजी त्यांना यूपीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करणार आहेत असे सांगितले जात आहे.

Exit mobile version