हिंदू महासभेने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. यासोबतच भारतीय चलनात गांधींच्या जागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा, असे पक्षाने म्हटले आहे. याचे कारणही देण्यात आले आहे.
नेताजी सभेचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान गांधींपेक्षा कमी नव्हते, असे हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे नेताजींचा आदर करणे आवश्यक आहे. नेताजींचा सन्मान करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चलनात (नोटा) गांधींच्या जागी नेताजींचा फोटो लावण्यात यावा असं मत गोस्वामी यांनी व्यक्त केलं आहे.
हिंदू महासभा पश्चिम बंगाल पंचायत निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. याबाबत महासभेने निर्णय घेतला आहे. महासभेच्या या निर्णयानंतर काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, भारतीय जनता पक्षानेही हिंदू महासभेवर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा:
बिपिन फुटबॉल अकादमीच्या शिबिरात मुले रंगली
काठमांडूनंतर आता गुजरात भूकंपाने हादरला
पाकिस्तानचे ऐकण्याची गरज नाही, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पाकला सुनावले
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा
हिंदू महासभेने येत्या काही दिवसांत आपला निवडणूक जाहीरनामा आणण्याची घोषणा केली आहे. गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी यांनभवानीपूरमधून निवडणूक लढवली होती.