26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणऔरंगजेबाच्या कबरीसमोर ओवैसी झुकले

औरंगजेबाच्या कबरीसमोर ओवैसी झुकले

Google News Follow

Related

आपल्या प्रक्षोभक भाषणांमुळे चर्चेत आलेले एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या ओवैसी यांनी मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले आहे. पण यामुळे आता नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. कारण औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

एमआयएमचे नेते आणि तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे सध्या महाराष्ट्रात दौऱ्यावर आले असून बुधवार १२ मे रोजी औरंगाबाद येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या सोबत खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले.

हे ही वाचा:

मंत्रालयसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

ग्यानव्यापीचा सर्वे होणारच! वाराणसी न्यायालयाचा फैसला

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

उत्तर प्रदेशात मदरशामध्ये गावे लागणार राष्ट्रगीत

यावरून आता राज्याचे राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावरून एमआयएम वर टीका केली आहे. एमआयएम पक्षाची कृती औरंगजेबासारख्या आहे. येथे पाय रोवून हिंदू आणि इतर समाजाला त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे खैरे म्हणाले. महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवही औरंगजेबाच्या कबरीकडे फिरकत नाहीत. औरंगजेब दुष्ट होता. त्यांनी हिंदूंसोबत मुस्लिम समाजालाही त्रास दिला. अशा माणसाच्या कबरीवर जाऊन एमआयएमचे लोक माथा टेकतात. ते अशा प्रकारचे वाद वाढवत आहेत. अकबरुद्दीन ओवैसी यांनी हिंदू समाजाच्या विरोधात वक्तव्य केले होते. प्रभू रामचंद्रांवरूनही वक्तव्य केले होते. आता ते औरंगाबादमध्ये वातावरण खराब करण्यासाठी आले आहेत असा हल्लाबोल खैरे यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा