27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणअकबर साजरा करायचा ख्रिसमस! मुघलांना सेक्युलर दाखवण्यासाठी आव्हाडांची धडपड?

अकबर साजरा करायचा ख्रिसमस! मुघलांना सेक्युलर दाखवण्यासाठी आव्हाडांची धडपड?

Google News Follow

Related

ख्रिसमस हा जगभरातील ख्रिस्ती धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण. दरवर्षी २५ डिसेंबरला येणारा हा सण भारतातील ख्रिस्ती बांधवही मोठ्या उत्साहात साजरा करतात. पण त्यातच आता मुघल बादशहा अकबर देखील ख्रिसमस हा सण साजरा करायचा असा नवीनच दावा पुढे येत आहे. हा दावा केला आहे महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी!

रविवार, २६ डिसेंबर रोजी आव्हाड यांनी एक ट्विट करत हा दावा केला आहे. आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो टाकला आहे आणि हे चर्च मुघल कालीन असून ते अकबर बादशहाने बांधले आहे असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर बादशाह अकबर ख्रिसमस साजरा करण्यासाठी या धार्मिक स्थळाला भेट देत होता असे आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्या या दाव्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

हे ही वाचा:

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षांची निवड?

ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर भारतविरोधी राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी

गुन्हेगारांना पकडताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी

राज्याचा आगामी अर्थसंकल्प नागपूरमधून

मुघलांना सेक्युलर दाखवण्यासाठी आव्हाडांची धडपड?
भारतावर अधिराज्य गाजवण्यासाठी आलेल्या मुघल आक्रांतांनी भारतातील धर्मस्थळांवर हल्ला चढवल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. गुजरात मधील सोमनाथ मंदिर, उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वराचे मंदिर, अयोध्येतील राम मंदिर अशा भारतातील अनेक महत्त्वाच्या मंदिरांचा विध्वंस मुघल शासकांनी केला. पण या मुघल सम्राटांना सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न अनेकांकडून वारंवार केला जातो. तसाच प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

तर आव्हाड यांच्या या दाव्यावरून त्यांची खिल्ली देखील उडवली जात आहे. आव्हाड यांचा हा दावा म्हणजे फेकाफेकी असल्याचे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तर आपल्या बायकांना शॉपिंग करण्यासाठी अकबरने फिनिक्स मॉल सुद्धा बांधला होता असा टोला ट्विटरवर काही नेटकऱ्यांनी आव्हाडांना लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा