मायावतींची भाच्यावरच ‘माया’

मायावतींची भाच्यावरच ‘माया’

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांचे नाव पक्षाचे उत्तराधिकारी म्हणून रविवारी जाहीर केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनाचा तरुण वारसदार,’ अशा शब्दांत आकाश आनंद स्वतःची ओळख सोशल मीडियावर करून देतात. आकाश आनंद हे गेल्या वर्षीपासून राजस्थानमध्ये बसपचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

२८ वर्षीय आकाश आनंद हे अनेकदा पक्षाच्या वर्तुळात दिसले असून बसपचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून ते काम पाहतात. या वर्षी ऑगस्टपासूनच त्यांचे पक्षातील वजन वाढल्याचे दिसत होते. लखनऊ येथे झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत आकाश आनंद उपस्थित होते. त्यामुळे आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मायावती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावली होती. त्याच महिन्यात आकाश आनंद यांनी पक्षाच्या १४ दिवसांच्या ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखे संकल्प यात्रे’चे नेतृत्वही केले होते.

सन २०१९च्या जानेवारी महिन्यात मायावतींनी आकाश आनंदच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली होती. मात्र त्याच वेळी मायावती यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला होता. मात्र मायावती यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि आनंद यांनी पक्षाचे उपाध्यक्षपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसारमाध्यमांपुढे जाहीर केले होते. ‘अलीकडेच मी आनंद यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती, परंतु घराणेशाहीमुळे त्यांनी स्वतः न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैवाने, माझ्या वाढदिवसाला आकाश दिसल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी त्याला पक्षाचा भावी चेहरा म्हणून सादर केले,’असे मायावती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. नंतर जूनमध्ये मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व भाचे आकाश आनंद यांची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली.

पक्षाने दानिश अली यांची लोकसभेतील बसपचे नेते म्हणून निवड केली. दानिश अली यांना शनिवारीच पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

काँग्रेस खासदार साहू यांच्याकडे मिळाली ३५१ कोटींची रोकड!

साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित

महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक

अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष

सन २०१९मध्ये निवडणूक आयोगाने मायावती यांच्यावर ४८ तासांच्या प्रचारावर बंदी घातली होती, तेव्हा आकाश आनंद यांनी राजकीय प्रचारसभेतील त्यांचे पहिले भाषण केले होते.

Exit mobile version