राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे. मात्र, या बैठकीबाबत वेगळीच चर्चा रंगली आहे. या बैठकीतील पोस्टरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाला आहे. पोस्टरवर अजित पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू असून बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालयात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचे फोटो होते. मात्र अजित पवार यांचा एकाही पोस्टरवर फोटो नाही. या बैठकीत पाच राज्यांच्या निवडणुका, महागाई आणि इतर आठ मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
केरळमध्ये ‘मैं बाबरी हूँ’ बिल्ले वाटून मुलांमध्ये पसरवत आहेत द्वेष
‘डॉक्टर आणि परिचारिकांना सौजन्याने वागण्याचे, ध्यानधारणेचे प्रशिक्षण द्या’
‘जेएनयू’त ‘फिर बनाओ बाबरी’ची उबळ
कोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागाराचीच होतेय कमाई
काही महिन्यांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते नाशिक महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या बिटको रुग्णालयाचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नामकरण करण्यात आले. तेव्हाही रुग्णालयाच्या समोरच शिवसेनेकडून मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांचा मोठा फोटो होता तसेच नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. मात्र, मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचाच फोटो होर्डिंगवरून गायब झाला होता. त्याच बरोबर आदित्य ठाकरे यांचाही फोटो होर्डिंगवर लावण्यात आला नव्हता. यावरूनही चर्चांना उधाण आले होते.