राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मानखुर्द शिवाजी नगरमधून नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक हे दहशतवादी असून त्यांनी देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आहे. एएनआयशी बोलताना असे वक्तव्य केले आहे.
“नवाब मलिक हे दहशतवादी असून त्यांनी भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आहे. नवाब मलिक हे दाऊदचा एजंट आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना तिकीट देऊन देशाचा विश्वासघात केला आहे. महायुतीच्या वतीने एकनाथ शिंदे यांचे उमेदवार सुरेश कृष्णा पाटील (बुलेट पाटील) यांच्या प्रचाराला भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली आहे,” असे सोमय्या म्हणाले.
मंगळवारी नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच जागेवर महायुतीने शिवसेनेचे सुरेश कृष्णा पाटील यांना अधिकृत उमेदवार म्हणून आधीच जाहीर केल्याने महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मानखुर्द शिवाजी नगर विधानसभेचे उमेदवार नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार नाही. महायुती आघाडीच्या पक्षांना कोणताही उमेदवार घोषित करण्याचा अधिकार असला तरीही त्यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला यापूर्वीच विरोध केला आहे. त्यांच्यावर दाऊदसोबत संबंध असल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा :
घुसखोर रोहिंग्यांना हवा आहे शाळेत प्रवेश, पण…
कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भारताविरुद्ध गुप्तचर माहिती फोडल्याची कबुली
सलमानला पुन्हा धमकी; अज्ञाताकडून दोन कोटींची मागणी
२६० मैल दूर अवकाशातून व्हिडीओ आला, विल्यम्स म्हणाल्या, दिवाळीच्या शुभेच्छा!
अणुशक्ती नगरचे दोन वेळा आमदार राहिलेले नवाब मलिक यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या मित्रपक्ष भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. नवाब मलिक यांची कन्या सना मलिक अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.