‘नेटफ्लिक्सकडून वेबसिरीज बनवली तर अजित पवारांना मिळतील दोन कोटी’

‘नेटफ्लिक्सकडून वेबसिरीज बनवली तर अजित पवारांना मिळतील दोन कोटी’

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सध्या आयकर विभागाकडून कारवाई चालू असून त्यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. ‘अजित पवार आणि सहकाऱ्यांवर सुरू असलेले छापे हे देशातील सर्वात मोठे छापे असल्याचे म्हटले आहे. नेटफ्लिक्सकडून वेब सीरिज करायची झाल्यास सीझन वनमध्ये अजित पवार असतील. त्यांना रॉयल्टीमधून दोन ते तीन कोटी मिळतील,’ असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरीही छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीत घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा:

…म्हणे मावळमधील गोळीबार भाजपाने भडकाविल्यामुळे!

‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट’

कबड्डीचा सराव करत असतानाच मुलीची हत्या करणारा आरोपी ताब्यात

काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे गुरु, त्यांना गुरू म्हणतात. मंत्र्यांच्या व्यवसायावर प्रतिबंध नाही, मात्र पदाचा फायदा घेऊन स्वतःच्या संस्थांना फायदा पोहोचवत राहणे गैर असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

जरंडेश्वर कारखान्याचे मालक मोहन पाटील, विजया पाटील आणि निताताई पाटील आहेत. हे तीन जण कोण आहेत, हे पवार कुटुंबांनी समोर येऊन सांगावं. विजया पाटील आणि निताताई पाटील या अजित पवारांच्या बहिणी आहेत. दरम्यान, जर बहिणींनी कोणताही घोटाळा केला नसेल, तर बहिणींच्या नावाने अजित पवारांनी बेनामी संपत्ती उभी केली आहे, का असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Exit mobile version