सध्या जुन्या पेन्शन योजनेला लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्रात विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून बेमुदत संप पुकारला आहे. त्यानिमित्ताने शिंदे फडणवीस सरकार चर्चा करणार आहे. मात्र याचदरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक जुना व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी जुन्या पेन्शन योजनेला कोणत्याही परिस्थितीत सुरू करता येणार नाही, असे विधानसभेत ठणकावून सांगितले होते.
अजित पवार हे आता विरोधी पक्षनेते असले तरी मागील सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, ही जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार का, त्यावर ते म्हणतात की, अजिबात सुरू होणार नाही. ते म्हणतात की, शासन अजिबात निर्णय घेणार नाही. मी सभागृहाला लक्षात आणून देतो. अर्थसंकल्पात १ लाख १५ हजार कोटी रु. वेतनावर खर्च होतो आणि २००५च्या आधीची पेन्शन ३६ हजार ३६८ कोटी रु. खर्च करतो.
हे ही वाचा:
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये फरक आहे
आपला पाठलाग केला गेला; शीतल म्हात्रेंनी केली तक्रार
शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी साईनाथ दुर्गे अटकेत
राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी
अजित पवार त्यात म्हणतात की, सरकार येतील जातील लोक ज्यांना निवडून द्यायचे त्यांना निवडून देतील. पण आज फक्त पेन्शन आणि पगार त्याच्यावर १ लाख ५१ हजार ३६८ कोटी रुपये खर्च करतो. अँदाजे उत्पन्न धरले तर ४ लाख कोटी जमा होतात. १ लाख ५१ हजार कोटी खर्च केले.
२००५मध्ये विचारपूर्वक केंद्र व राज्य सरकारने हा निर्णय घेतला पेन्शन सुरू न ठेवण्याचा. १० टक्के कर्मचाऱ्याच्या पगारातून आणि १० टक्के सरकार टाकत असे. आता १० टक्के कर्मचाऱ्याचे १४ टक्के सरकराचे अशी २४ टक्के रक्कम काढली जाते. निवृत्त झाल्यावर ती रक्कम दिली जाते. म्हणून हा खटाटोप करत आहोत.
अजित पवार यांचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आताच्या महाविकास आघाडीने कोणत्या तोंडाने जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा द्यावा असा सवाल उपस्थित केला जात आहे.