आज सादर होणार ठाकरे सरकारचा तिसरा अर्थसंकल्प

आज सादर होणार ठाकरे सरकारचा तिसरा अर्थसंकल्प

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत असून आज अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षाच्या दृष्टीने राज्य सरकार महाराष्ट्राला काय देणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज दुपारी दोन वाजता विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. यासाठी अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधिमंडळात दाखल झाले आहेत. ब्रिफकेसमध्ये राज्याचा अर्थसंकल्प घेऊन अर्थमंत्री विधिमंडळात दाखल झाले. दरम्यान विधिमंडळात आल्यावर सभागृहात जाण्याआधी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील अर्थसंकल्प मांडणीच्या वेळेला सभागृहात उपस्थित असणार आहेत. त्यासाठी ते विधिमंडळात दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम

पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!

मोबाईल रिपेअर करणाऱ्याने मुख्यमंत्री चन्नी यांना केले पराभूत

अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा?
ठाकरे सरकार सत्तारूढ झाल्यापासूनचा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. एकीकडे कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील जनतेवर विपरीत परिणाम झाला आहे. तर त्यासोबतच अतिवृष्टी, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळेही राज्याच्या जनतेला त्रास सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या जनतेला ठाकरे सरकारकडून काही दिलासा मिळणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

तर केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कमी करूनही ठाकरे सरकारने या करात कोणतीच कपात केलेली नाही. त्यामुळे त्याबाबत काही घोषणा होणार का? याकडेही लक्ष लागले आहे. या सोबतच राज्यात होणं घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज्याच्या अर्थसंकल्पात काही विशेष तरतुदी असणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version