‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

“कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, अशी जहरी टीका नितेश राणेंनी अजितदादांवर केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. “हे लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का?” असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपा आमदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली. “कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, अशी टीका नितेश राणेंनी केली. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

हे लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार असं म्हणाले होते. पत्रकारांनी नारायण राणेंच्या चिपळूण दौऱ्याबद्दल विचारल्यावर अजित पवारांनी हे उत्तर दिले होते. अजितदादांच्या त्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी उपरोक्त टिप्पणी केली.

हे ही वाचा:

काय आहे राकेश झुनझुनवाला आणि अकासा एरलाईन्स कनेक्शन?

पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा

‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार

सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मी चिपळूणमधली सगळी पाहणी करुन झाली तरी एकही अधिकारी मला येऊन भेटला नाही, हे काही बरोबर नाही. हे मी खपवून घेणार नाही, अशी तंबी राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यावर अधिकारी सीएमसाहेबांना निरोप देण्यासाठी गेले आहेत, असं समोरील अधिकाऱ्याने सांगताच, सीएम गेला उडत. मला कुणाची नावं सांगू नका, असे नारायण राणे म्हणाले होते.

Exit mobile version