सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देऊन आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला

अजित पवारांनी केला गौप्यस्फोट

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देऊन आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तासगावमधील सभेत बोलताना सिंचन घोटाळ्याच्या आरोपाबद्दल भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला. सिंचन घोटाळ्याचे आरोप फक्त बदनाम करण्यासाठी झाले होते, असे अजित पवार म्हणाले. तसेच या आरोपानंतर खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप अजित पवारांनी केला.

अजित पवार म्हणाले की, केवळ बदनाम करण्यासाठी म्हणून ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली होती. ती फाईल गृहखात्याकडे गेल्यानंतर आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसाने गळा कापयाची कामं झाली. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झालं. परंतु माझ्या त्या फाईलवर सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्यात आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

राम मंदिर आणि उज्जैनच्या महाकाळ मंदिराला मिळाली धमकी

शरद पवारांची पाचवी यादी; पंढरपूर, माढा जागेवर दिले उमेदवार

पंतप्रधान मोदींकडून ५१ हजार नोकऱ्यांची दिवाळी भेट

भाजपाची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत १४८ जागांवर दिले उमेदवार!

पुढे अजित पवार म्हणाले की, २०१४ मध्ये विधानसभेचा निकाल लागतो न लागतो तोपर्यंतच साहेबांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. भाजपला बिनशर्थ पाठिंबा कसं काय दिला जातो. विचारधारा सोडून कशी मदत केली असं विचारल्यावर साहेबांनी सांगितलं सरकार बदललं आहे मदत केली पाहिजे. १९९९ मध्ये देखील असंच झालं होतं. सोनिया गांधी यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीची स्थापना झाली. लगेच विधानसभा निवडणुका होताच काँग्रेसला पाठिंबा दिला. तेव्हा देखील साहेब म्हणाले सरकारमध्ये गेल्याशिवाय काम होत नाहीत. मग मी गेलो तर काय झालं. माझं काय चुकलं, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

Exit mobile version