पुण्यातील गुप्त भेटीवर अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा

पुण्यातील गुप्त भेटीवर अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा झाल्या होत्या. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याच्या बैठकीचे मनावर घेऊ नका. शरद पवार हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. ते कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मी कुठेही लपून गेलो नाही. मी कधी लपून गेलो सांगा? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया यांनी शरद पवारांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते, असे अजित पवार म्हणाले. दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाणे काय चुकीचे आहे का? मी नात्यानं शरद पवार यांचा पुतण्या लागतो. त्यामुळं कारण नसताना याला काहीजण वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देत आहेत. त्यातून समज गैरसमज निर्माण होत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी भेटताना मी ज्या गाडीत होतो, त्या गाडीचा अपघात झालाच नव्हता असे स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी दिले. मी उथळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता मला लपून जाण्याचे कारण काय? असेही अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

अमेरिकेचे विमान तीन मिनिटांत १५ हजार फूट खाली; प्रवाशांची भीतीने गाळण

लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळ भाषण करण्याचे रेकोर्ड नरेंद्र मोदींच्याचं नावे

वृत्तवाहिन्यांच्या ‘बेताल’ बातम्यांमुळे तपासावर परिणाम

मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला

प्रकरण काय?

पुण्यातील चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवारांचा ताफा सर्किट हाऊसकडे रवाना झाला होता. मात्र, त्यानंतर ताफा तिथेच ठेवून अजित पवार कार्यकर्त्याच्या गाडीत बसून कोरेगाव पार्क येथील उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तिथे शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर पवार काका-पुतण्यामध्ये चर्चा झाली आणि अजित पवार बाहेर पडले, असं मध्यामांकडून सांगण्यात आले. जयंत पाटील हे देखील यावेळी बैठकीसाठी उपस्थित होते.

Exit mobile version