28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणमहाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिले

महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिले

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मानले मतदारांचे आभार

Google News Follow

Related

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमतापेक्षा अधिकच आकडा गाठत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र पत्रकार परिषद झाली. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर टीका करत जनतेचे आभार मानले आहेत.

“महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे पाहून यश प्राप्त करुन दिलं आहे. सगळ्या महाराष्ट्राचे आभार. कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे असं समजून काम केले. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आलं. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना योजना आणल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजरच ठरली. त्यामुळे सगळे विरोधक उताणे पडले. आता आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“राज्यात प्रचंड बहुमताने सरकार आले आहे. राजकारणात आल्यापासून इतकं प्रचंड बहुमत पाहिलेलं नाही. या यशाने आम्ही हुरळून देखील जाणार नाही. जसे आकडे पाहत होतो, तेव्हा आर्थिक गोष्टी समोर येत होत्या. पण, आम्ही आर्थिक शिस्त समोर आणू, आम्हाला याचा अनुभव आहे. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्यांचा आधार आहे,” असं अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”

अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक! ८३ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय

उद्धव ठाकरेंना २० देखील जागा गाठत्या आल्या नाहीत, राज्याला तोंड दाखवू नये!

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर जनतेचा विश्वास बसलाय”

अजित पवारांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले की, “बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायला हवी होती, असं विरोधक म्हणत आहेत. पण, मग ती लोकसभेलाही घ्यायला हवी होती. तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं का? झारखंड आमच्या हातून गेलं आहे आम्ही काही म्हटलं आहे का?” अजित पवार असेही म्हणाले की, पाच वर्षे आम्ही अत्यंत एकोप्याने शेवटपर्यंत काम करू आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठीच काम करु. विकास हा केंद्रबिंदू मानून आम्ही करत आहोत, करत राहू.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा