माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही…अजित पवारांचा टोला

अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केले वक्तव्य

माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही…अजित पवारांचा टोला

विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यासंबंधी घोषणा अधिवेशनात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना काही मिश्कील टिपण्णी केल्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावल्याच्या चर्चा आहेत.

माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही हे मी कृपा करुन आपल्याला सगळ्यांना सांगतो, असं भाषणावेळी अजित पवारांनी म्हणत हात जोडले. यावर सभागृहातले सत्ताधारी पक्षातले आणि विरोधी पक्षातले आमदार खळखळून हसताना दिसले. त्यामुळे अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

“विरोधी पक्षनेते पद द्यायचं म्हटलं तर विजय वडेट्टीवार यांचे नाव दुसऱ्यांदा आले. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे पद घेतील असं वाटलं होतं. पण जे लढायचं ते तुम्ही लढा नंतर पुन्हा दिवस चांगले आले. आम्ही आहेच. अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो. मी कुणाचं नाव घेत नाही. गंमतीचा भाग सोडून द्या, माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही हे मी कृपा करुन आपल्याला सगळ्यांना सांगतो असं हसत म्हणत अजित पवारांनी हातही जोडले. त्यावर अशोक चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात यांना हसत टाळीही दिली.

उद्धव ठाकरे टीका करताना टोमणे मारतात अशी टीका भाजपाकडून वारंवार केली जाते. अशात अजित पवारांनी असा उल्लेख केल्यामुळे विजय वडेट्टीवारांचं कौतुक करत असताना सभागृहात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवाय त्यांच्या वक्तव्यावर सभागृहात हसू फुलल्याचे चित्र होते.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ३७० बाबत कपिल सिब्बल यांची तासमपट्टी

अंदमान बेटांवर बसले भूकंपाचे धक्के

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ज्ञानव्यापी मशीद सर्वेक्षणाला हिरवा झेंडा

चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद

आज विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल विधानसभेत त्यांच्या आभाराच्या प्रस्तावाची भाषणं झाली. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं. आपल्या भाषणात अजित पवार यांनी विजय वडेट्टीवाराचं कौतुक करताना मला टोमणे मारायची सवय नाही असं हात जोडून सांगितलं.

Exit mobile version