“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”

अजित पवारांची सुषमा अंधारेंवर टीका

“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”

सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात सुषमा अंधारे भावुक झाल्या होत्या. जेव्हा आमदार माझ्यावर टीका करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही, तेव्हा मला अपेक्षित होतं की, सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता, असं म्हणत सुषमा अंधारे भावनिक झाल्या. याबद्दल प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सुषमा अंधारेंना फटकारलं आहे.

“सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या नेत्या आहेत. त्यांनी पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा, त्या ज्या पक्षाचं काम बघतात ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करतात आणि सभा घेत आहेत. त्यांच्यासमोर भावनिक व्हावं,” असं सुनावलं आहे.

“पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडणं योग्य ठरलं असतं. तो मुद्दा विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना उचलून धरता आला असता,” अशा शब्दांत अजित पवार यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा:

वाढताहेत उन्हाच्या झळा, मुंबईकरांनो पुढील दोन दिवस तब्येत सांभाळा!

“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”

सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर, निकालात मुलींची बाजी

उद्धव ठाकरे अजूनही स्वतःच्या राजीनाम्याच्या प्रेमात

यावर आपण अजित पवारांचे नाव घेतले नसून ते सर्व विरोधी बाकावर बसणाऱ्या नेत्यांसाठी असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version