27 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरराजकारण“सुनेला ४० वर्ष झाले तरी बाहेरची मग किती वर्ष झाल्यावर घरची?”

“सुनेला ४० वर्ष झाले तरी बाहेरची मग किती वर्ष झाल्यावर घरची?”

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना खोचक सवाल

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या बारामती मतदार संघात सध्या पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. याचं पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. अशातच शरद पवारांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार पलटवार करत निशाणा साधला.

“जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचे. म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही,” असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी, यात चूक काय, असे विचारत म्हटले की, “दोन गोष्टी असतात. एक मूळचे पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार,” असे म्हणत सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचे सुचविले होते. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरावरून टीका करण्यात आली होती. यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला होता. अखेर अजित पवार यांनीही आता शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार म्हणाले की, “काही वडीलधारे जुना काळ आठवत असतील तर त्यांना म्हणा की, जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. नुसते सासू सासू मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी? किती वर्ष झाल्यावर या घरची ते सांगा?”, असा सणसणीत प्रश्न अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना विचारला आहे.

हे ही वाचा..

मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!

दिनेश कार्तिक बनणार टीम इंडियाचा फिनिशर?

ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक

भाजपकडून उमेदवारांची १२वी यादी जाहीर, साताऱ्यातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

“मी एक वेगळी भूमिका घेतली आणि प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि ८० टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. याचे कारण आपले प्रश्न सुटावे. गेल्या १२ वर्षात केंद्र सरकारचा बारामतीसाठी निधी आलेला नाही,” असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीकेचा निशाणा साधला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा