‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर

‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या या प्रतिक्रियेची सध्या राज्यभर चांगलीच चर्चा आहे. एकीकडे राज्यातील गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असताना अजित पवार यांनीच गृह खात्याच्या कारभाराबद्दल बोलल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार हे यांचे पुण्यात मॅरेथॉन कार्यक्रम आहेत. अनेक कामांचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर आज फडणवीस यांचेही पुण्यात कर्यक्रम होते. पण पोलिसांनी चौकशीची नोटीस बजावल्यामुळे फडणवीस यांनी आपले कार्यक्रम रद्द केले आहेत. सध्या फडणवीस यांच्या या चौकशीची चांगलीच चर्चा राज्यभर रंगली आहे.

हे ही वाचा:

भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती

राज्यभर भाजपा आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची होळी

देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरु

‘देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची करणार होळी’

या संदर्भातच अजित पवार यांना प्रश्न विचारला असता राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती असे म्हटले आहे. अजित परर यांच्या या विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून चांगलीच चर्चा रंगली आहे. गेल्या तासाभरापासून सागर बंगल्यात डीसीपी हेमराज सिंह, नितीन जाधव फडणवीस यांची चौकशी करत आहेत. सागर बंगल्यातील एका खोलीत ही चौकशी सुरू आहे. तर यावेळी फडणवीस यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी भाजपाचे अनेक नेते सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. यामध्ये विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, अभिमन्यू पवार, कालिदास कोळंबकर या सर्वांचा समावेश आहे.

Exit mobile version