29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारण‘आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचे प्रतिनिधित्व करत नाही!

‘आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचे प्रतिनिधित्व करत नाही!

Google News Follow

Related

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांची शाळा घेतली. सभागृहात वर्तन कसे असावे यावर उपमुख्यमंत्र्यांनी आमदारांचे कान टोचले. अजित पवारांच्या बोलण्याला विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी समर्थन दिले. १२ कोटी जनतेचे आपण प्रतिनिधीत्व करतो, हे ध्यानात ठेवावे, म्हणजे आपल्याकडून व्यवस्थित वर्तन होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार इथपर्यंत पोहोचतात, त्यामुळे हे लक्षात ठेवावे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही. हा सर्व प्रकार लज्जास्पद असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तुम्ही असे वागलात तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सर्वच सदस्यांनी आपण काय बोलतोय याचे भान ठेवा, असे अजित पवार यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला आमदारांना सांगितले.

देशाचे लोकसभा असो किंवा राज्याचे विधानसभा असो यांना लोकशाहीत राज्य चालवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय करतो, कसे वागतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण जनतेचे विश्वस्त म्हणून इथे आलो आहोत त्यामुळे या जागेची मूल्य आपण पाळायला हवीत, असे फडणवीस म्हणाले. नियमांचे पालन व्हायला हवे, सभागृहाचा दर्जा कायम ठेवायला हवा. या पदाची जबाबदारी समजून घ्यायला हवी. १२ कोटी जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल करायला हवे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मतदारांना काय वाटेल, आपण निवडून दिलेला माणूस तिथे जातो आणि अशा पद्धतीने आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख पक्ष आणि इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

विधीमंडळाचा सदस्य सभागृहात कसा बोलतो, कसा वागतो, आवारात त्याचे वर्तन कसे आहे. सार्वजनिक जीवनात कसा वावरतो, या सगळ्यावर त्याची स्वतःची आणि विधीमंडळाची प्रतिमा ठरत असते. गेल्या काही वर्षांमध्ये सभागृहातील सदस्यांच्या वर्तनामुळे आपल्या सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच धक्का पोहोचला आहे, असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला अटक

दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

संसदीय सदाचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता यावरील पुस्तक सर्वांनी वाचण्याची गरज आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. कोणीही येतं आणि कुठेही बसू पाहतात, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे ते तरी भान हवं, असे अजित पवार म्हणाले. कोणी काही बोलत असताना त्याला पाठ दाखवतात, अध्यक्षांना आल्यावर किंवा जाताना नमस्कार करत नाहीत, असे अधिवेशनातील आमदारांच्या वर्तणुकीचे वर्णन करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण जगभरात होत असते, त्यामुळे याचे भान सर्वांनी ठेवावे असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या वक्तव्यांना देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, बाळासाहेब थोरात, अनिल परब, एकनाथ शिंदे, अशा अनेक नेत्यांनी सहमती दर्शवली.

अधिवेशनाच्या आवारात भाजप आमदार नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचले होते. त्यावरून नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्यामध्ये ट्विटरवरून फोटो युद्ध सुरू झाले होते. त्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनंतर त्यांनी माफी मागितली. यावरूनच अजित पवारांनी आमदारांना खडे बोल सुनावले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा