आधी पित्त मग अजित पवार पत्रकारांवर खवळले…खात्री करून बातम्या द्या!

अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्यांनी वेगवेगळ्या चर्चांना ऊत

आधी पित्त मग अजित पवार पत्रकारांवर खवळले…खात्री करून बातम्या द्या!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी कुठे नॉट रिचेबल झाले याची चर्चा दिवसभर सुरू होती. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला काही वेगळे वळण लाभणार का, याची चर्चा रंगू लागली. पण अजित पवारांनी यामागील नेमके कारण स्पष्ट केले तरी त्यावरून वेगवेगळी मतमतांतरे समोर येतच राहिली. पण पत्रकारांनी यासंदर्भात खात्री करून बातमी द्यायला हवी होती. यातून निष्कारण बदनामी झाली अशी स्पष्ट भूमिका मांडली.

अजित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो, मात्र माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्री करुनच बातम्या दाखवण्याची सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केली आहे.

काल शुक्रवारी पुण्यात होतो. दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. मात्र गेल्या काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकुल परिणाम माझ्या तब्येतीवर झाला, पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवासस्थानी विश्रांती घेतली. मात्र या काळात मी ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही मर्यादा असते. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो, अशा शब्दांत आपली नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

बोनी कपूरची चांदीची भांडी जप्त, किंमत ३९ लाख

मुद्रा योजनेंतर्गत ४०.८२ कोटी लोकांना मिळाली २३. २ लाख कोटींची कर्जे

अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत

अदानींना लक्ष्य केले गेले, हिंडेनबर्गच्या आरोपांना नको तितके महत्त्व दिले गेले – इति शरद पवार

आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्याविषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही असे स्पष्ट सांगतानाच माध्यमांनी खात्री करुनच यापुढे बातम्या चालविण्याची सूचना अजित पवार यांनी माध्यमांना केली.

Exit mobile version