महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी विकासाच्या अजेंड्यावर लोकांचे मन जिंकले आहे असे जिओत पवार यांनी म्हटले आहे. पुणे येथे पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींबद्दल कौतुकोद्गार काढले. त्यांच्या या विधानाची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सत्तारूढ झाले तेवहा ते विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले. विकासाच्या अजेंड्याने त्यांनी लोकांचे मन जिंकून घेतले आहे असे अजित पवार म्हणाले. तर लोक त्यांनाच संधी देतात जे विकासाची भाषा करतात असेही अजित पवार यांनी नमूद केले. यावेळी नवाब मलिक यांच्या विषयात प्रतिक्रिया विचारल्यावर मी या विषयात बोलणार नाही. मी फक्त विकासासाठी काम करतो असे पवार यांनी सांगितले. पत्रकार कायम असे प्रश्न विचारतात पण फार कमी लोक असे असतात ज्यांना या सगळ्यात रुची असते असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी
सेबीच्या अध्यक्षपदी माधबी पुरी बुच
रशिया-युक्रेन युद्धात बेलारुसची भूमिका काय?
६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी शहराचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत. तर पंतप्रधानांच्या दौऱ्या अगोदर सर्व प्रशासकीय यंत्रणांचा आणि सुरक्षा व्यवस्थेचाही ते आढावा घेताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बद्दल मात्र त्यांनी खात्री दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती बाबत मी कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही. कारण त्यांची तब्येत त्यांना साथ देईल का मला माहीत नाही असे पवार यांनी म्हटले आहे.